| २३ - मार्च - २०२१ |
गहाळ मोबाईल परत केले बाबत. |
दि 23/03/2021 रोजीचे 11.30 वा. महिला नामे तजीन कैस बांगी वय 30 वर्षे यांचा MI-6 मॉडेलचा 11500/- रुपये किमतीचा मोबाईल फोन नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील सोपारा गाव ते कोहिनूर मॉल दरम्यान रिक्षाने प्रवास करीत असताना गहाळ झाल्याची तक्रार देण्यास पोलीस ठाणेमध्ये आल्या असता, ठाणे अंमलदर पोहवा/पागधरे यांनी पोशि/प्रतीक पिंगळे व पोशि/सचिन मोहिते यांना सदर बाबत सांगितले असता, त्यांनी सदर मोबाईल फोनचे वर्णन व त्यातील सिम नंबर घेऊन सदर नंबर वर फोन केला असता रिक्षा चालक नामे तंजीर सय्यद यांनी फोन रिसिव्ह केला असता त्यांना पोलीस ठाणे मधून बोलतोय असे सांगितले असता त्यांनी सदर मोबाईल रिक्षात मिळाला असे कळविल्याने त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून सदर मोबाईल फोन त्या महिलेस परत करून रिक्षा चालकाचे अभिनंदन केले. |
 |